Thursday, July 30, 2026
spot_img
HomeDeathमृत व्यक्तीस ओळखत असेल तर संपर्क करावा

मृत व्यक्तीस ओळखत असेल तर संपर्क करावा

मृत व्यक्तीस ओळखत असेल तर संपर्क करावा

Shreyash Wankhede:

श्री. कुणाल देवराव हेडाऊ वय 25 वर्ष राहणार बंगाली कॅम्प नवीन पाण्याचे टाकीजवळ चंद्रपूर यांनी पोलीस चौकी महाकाली येथे येऊन माहिती दिली की, एक वयोवृद्ध इसम वय अंदाजे 65 ते 70 वर्ष हा अंदाजे सहा ते सात महिन्यापासून एसपी हार्डवेअर बागला चौक चंद्रपूर येथे फुटपाथ वर राहत होता व तो रुग्णालयात घुसत होता, तसेच त्याचे उजव्या हाताचे बोटात जखम होऊन जखम सडल्यासारखी झाली होती व तो बीमार होता. दिनांक 20/ 2 /24 चे 20/00 वाजता  सुमारास त्यास आवाज दिला असता, त्याचे काही हालचाल दिसून आली नाही म्हणून तो मरण पावला असावा असे सांगितल्याने त्यास सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे  नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

 मृतकाचे वर्णन – रंग काळा सावळा ,डोक्याचे केस काळे पांढरे, दाढी मिशी वाढलेली, अंगात मळकट पांढऱ्या रंगाचा शर्ट  व करड्या रंगाचा फुल पॅन्ट घातलेला असून उजव्या हाताचे पंजावर जखम असून जखम सडलेली आहे  उंची 165से.मी.,बांधा सडपातळ आहे. तरी सदर इसमास कोणी ओळखत असल्यास पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे PSI विजय मुके मोबाईल क्रमांक 99 23 40 10 65 यांच्याशी संपर्क साधावा. हि विनंती.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page