शिपाई शरदभाऊ टोंगे यांना भावपूर्ण निरोप
श्रेयश वानखेडे:
जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर चे शिपाई शरदभाऊ टोंगे हे अविरत 33 वर्षाच्या सेवेनंतर 31 मे 2025 ला निवृत्त झाले. त्यानिमित्ताने शाळेच्या हॉलमध्ये त्यांचा निरोप तथा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. के. लांडे मंचावर उपस्थित होते. तसेच सत्कारमूर्ती शरदभाऊ टोंगे, पत्नी मंगलाताई टोंगे तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक आर. आर. निखाडे, पाळी प्रमुख पी. डब्ल्यू. मत्ते, जेष्ठ शिक्षिका एम. एस. तुराणकर, ग्रंथपाल पी. आर. सातपुते, जेष्ठ लिपिक आर. डी. राठोड मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांच्या फोटोला माल्यार्पण तथा दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
यानंतर ग्रंथपाल पी. आर. सातपुते यांनी शरद टोंगे यांचा परिचय तथा त्यांचे कार्य प्रास्ताविक भाषणातून विशद केले.
त्यानंतर शरदभाऊ टोंगे यांचा मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शरद भाऊ यांच्या मुली स्वाती, महेश्वरी आणि अश्विनी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी आर. आर. निखाडे, पी. डब्ल्यू. मत्ते, एम. एस. तुराणकर, एस. डी. गौरकार, पी. एम. उरकुंडे, यांनी मनोगतातून शरद भाऊंच्या कार्याच्या आठवर्णीना उजाळा दिला.
तदनंतर शरद भाऊ यांची मोठी *मुलगी स्वाती तसेच अर्धांगिनी मंगलाताई* यांनी शरद भाऊंनी शाळेसाठी तसेच कुटुंबासाठी कसे योगदान दिले यावर भाष्य केले.
मुख्याध्यापक बी. के. लांडे यांनी अध्यक्षीय भाषणातून शरदभाऊ टोंगे यांनी शाळेसाठी अविरत 33 वर्षे केलेल्या योगदानाची आठवण करून दिली. तसेच कुटुंब, समाजासाठी जगा, आनंदी रहा, आरोग्य जपा असा संदेश देऊन पुढील आयुष्य हसत आनंदाने जगण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन एम. एल. पानघाटे तर आभार ए. एन. नवले यांनी मानले. याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.