Monday, September 14, 2026
spot_img
HomeEducation15 व 16 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन

15 व 16 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन

15 व 16 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन

श्रेयश वानखेडे:

अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघ व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाशी संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्ह्याचे अधिवेशन दिनांक 15 व 16 फेब्रुवारी 2025 ला उद्धव सेलिब्रेशन हॉल बल्लारपूर रोड राजुरा येथे संपन्न होत आहे.

या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार मान. देवरावजी भोंगळे, प्रमुख मार्गदर्शक माजी शिक्षक आमदार मा. नागो गाणार, स्वागत अध्यक्ष मान. विलास बोनगीरवार (माजी नगराध्यक्ष) तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. विलास खोंड हे राहणार असून, विशेष उपस्थिती माजी आमदार एडवोकेट वामनराव चटप, राज्य महिला आघाडी प्रमुख सौ पूजाताई चौधरी, राज्य कार्याध्यक्ष प्राथमिक विभाग प्रकाश जुनारकर, नागपूर विभाग अध्यक्ष अजय वानखेडे, विभाग उपाध्यक्ष विनोद पांढरे, विभाग उपाध्यक्ष मधुकर मुपीडवार, विभाग संघटन मंत्री रामदास गिरडकर, विभाग कार्यवाह सुभाष गोतमारे,  प्राथमिक विभाग कार्यवाह विलास बोबडे, चंद्रपूर जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक) राजेश पातळे, संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, जिल्हा कार्यवाह दिलीप मेकलवार, जिल्हा महिला आघाडी प्रमुख संध्याताई गिरटकर, कॉन्व्हेंट विभाग प्रमुख विवेक आंबेकर, चंद्रपूर शहर अध्यक्ष देवेंद्र कांचर्लावार, प्राथमिक जिल्हाध्यक्ष सरिताताई सोनकुसरे, जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष अमोल देठे हे उपस्थित राहणार आहे.

शनिवार दिनांक 15 फेब्रुवारीला जुनी पेन्शन ओ पी एस यू पी एस व तक्रार निवारण सत्र होणार असून रविवार दिनांक 16 फेब्रुवारीला रजा नियम तथा खुले अधिवेशन होणार आहे.

यात जुनी पेन्शन, नैसर्गिक वाढीच्या तुकड्याला अनुदान देणे, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना सेवा संरक्षण देणे, चतुर्थ श्रेणी पद पूर्ववत करणे, अर्धवेळ ग्रंथपाल पूर्णवेळ करणे, रात्र शाळा शिक्षकांना पूर्ण शिक्षकाचा दर्जा देणे, बीएलओ चे काम शिक्षकांना न देणे, वरिष्ठ वेतनश्रेणी व  विनाअट लागू करणे, एम ई पी एस नुसार कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतनासह सर्व लाभ देणे, या विषयावर चर्चा होणार आहे.

प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, नगर परिषद, जिल्हा परिषद, आश्रम शाळा, तसेच कॉन्व्हेंट शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संयुक्त जिल्हा अधिवेशनाला सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष विलास खोंड, सौ सरिता सोनकुसरे (प्राथमिक) अमोल देठे( जिल्हा परिषद) विवेक आंबेकर (कॉन्व्हेंट स्कूल) देवेंद्र कांचर्लावार चंद्रपूर शहर, जिल्हा कार्यवाह दिलीप मेकलवार, संतोष सोनवणे( प्राथमिक) विलास खाडे (जिल्हा परिषद) वसंत वडस्कर (चंद्रपूर शहर) संजय उपाध्ये (कॉन्व्हेंट स्कूल) संयोजक डॉ. किशोर टेंभुर्णे, सहसंयोजक संजय लाडे दयानंद चिंतलवार, मुस्तकीन पठाण (जिल्हा कार्याध्यक्ष), धनंजय बोरकर (जिल्हा कोषाध्यक्ष) किशोर मोहुर्ले (कॉन्व्हेंट स्कूल) व समस्त जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page