Monday, April 20, 2026
HomeEducationथकीत देयके आस्थापनेची चौकशी करा
spot_img

थकीत देयके आस्थापनेची चौकशी करा

थकीत देयके आस्थापनेची चौकशी करा

आमदार सुधाकर अडबाले यांचे भंडारा येथे समस्या निवारण सभेत निर्देश

श्रेयश वानखेडे :

जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची थकित देयके वेतन पथक कार्यालयाने पडताळणी न करता शिक्षण उपसंचालक कार्यालयात पाठविली. क्षुल्लक त्रुटींमुळे मार्च अखेरीस शेकडो देयके परत आली. त्यामुळे ३१ मार्च पूर्वी निकाली निघणारी थकित देयके पुन्हा वर्षभर प्रलंबित राहिली. यामुळे वेतन पथक अधिक्षक (माध्य.) कार्यालयातील थकित देयके आस्थापनेची तात्काळ चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात यावी व दोषींवर कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना दिले.

आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या ‘समस्या तुमच्या, पुढाकार आमचा’ या उपक्रमाअंतर्गत शिक्षणाधिकारी (प्राथ. / माध्य.), जि.प. भंडारा यांच्याकडे भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ समस्या निवारण सभा जे. एम. पटेल कॉलेज सभागृहात पार पडली. सदर सभा सात तास चालली.

यावेळी माध्यमिक विभागातील मागील सभेतील इतिवृत्तावर चर्चा करण्यात आली. शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेला होत नसल्याने आमदार सुधाकर अडबाले यांनी वेतन पथक अधिक्षक यांना जाब विचारला. वेतन बिल वेळेत मागवा आणि दरमहा १ तारखेला अदा करा, अशा सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी वेतन पथक अधिक्षक यांना दिल्या.

प्रशासकीय मान्यता झालेल्या थकबाकी देयके निकाली काढली नाही. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.  वरिष्ठ / निवड श्रेणी, वैद्यकीय देयके, सेवानिवृत्ती प्रकरणे, जीपीएफ पावत्या, ग्रॅज्युएटी प्रकरणे, समायोजन प्रकरणे, अर्जित रजा रोखीकरण, वेतनेत्तर अनुदान व इतर सामूहिक व वैयक्‍तिक प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. तसेच अनुकंपा प्रकरणांची सविस्तर माहिती एका आठवड्यात देण्यात यावी व प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी, अशा सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना दिल्या. वेतनेत्तर अनुदान येत्या १५ दिवसांत जमा करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी सांगितले.

यानंतर प्राथमिक विभागाची बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषद शाळेतील उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, विषय शिक्षक व इतर पदोन्नती बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती प्रकरणे ८ दिवसांत निकाली काढण्याच्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना दिल्या. जीपीएफ पावत्या ३१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन करा, पेंशन दरमहा १ तारखेला खात्यात जमा करा,  एनपीएस रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करा व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. प्राथमिक विभागातील समस्या बऱ्याच प्रलंबित असल्याने त्या तात्काळ निघाली काढाव्या, अशा सूचना देखील आमदार सुधाकर अडबाले यांनी दिल्या.

सभेला माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, शिक्षण सभापती श्री. ईश्वरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. परब, शिक्षणाधिकारी (माध्य.) रवींद्र सलामे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) रवींद्र सोनटक्के, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. वाहाने, वेतन पथक अधिक्षक प्रभा दुपारे, समाज कल्याण अधिकारी कोल्हे मॅडम, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, जिल्हा कार्याध्यक्ष टेकचंद मारबते, जिल्हा कोषाध्यक्ष धीरज बांते, जिल्हा उपाध्यक्ष रंजन कुमार डे, विवेक मोटघरे, पुरुषोत्तम लांजेवार, विजय देवगिरीकर, पंजाब राठोड, मनोहर कापगते, रोहित मरस्कोल्हे, अनंत जायभाये, सुधाकर धाडसे, खेमराज वासनिक, बाळकृष्ण लंजे, बी.आर मेश्राम, विज्युक्टा जिल्हाध्यक्ष मार्तंडराव गायधने, भीमराव मेश्राम, विनोदकुमार मेश्राम, प्रमोद सेलोकर, जागेश्वर मेश्राम, विलास खोब्रागडे, रुपेश नागलवाडे, अशोक गिरी, भीष्म टेम्भूर्णे, राहुल डोंगरे, प्रा. अशोक गायधनी, डाॅ. ज्ञानेश्वर गौपाले, प्रा. मधुसूदन किरणापूरे, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष फारुख शहा, कैलास चौहान, संतोष मडावी, विवेक हजारे, श्याम सूर्यवंशी, रुपेश नागलवाडे, भूपेश हुमने, दिनेश शिवणकर, अमोल जांभूळे,  खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर मेश्राम, दारासिंग चव्हाण, जि.प. प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सैय्यद मुबारक, सुधीर वाघमारे, अरुण बघेले, अनिल गयगये, पांडूरंग नखते, संजय अजबले, पुडके सर, रवी नखाते, युवराज वंजारी, श्रीधर काकिरवार, आचल दमले, ज्ञानेश्वर दमाहे, ढेंगे सर, सर्व गटशिक्षणाधिकारी, संबंधित अधिकारी व मोठ्या संख्येने जिल्ह्यातील विमाशि संघ, विविध शिक्षक संघटनेचे सदस्‍य, समस्‍याग्रस्‍त शिक्षक उपस्‍थित होते.


Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page