मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम बक्षीस वितरण सोहळा
Jyotsna Wankhede:
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे ‘क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम’ बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या बक्षीस वितरण सोहळ्याचे अध्यक्ष, मा. श्री जैनुद्दीन जव्हेरी (माजी आमदार, विधान परिषद व अध्यक्ष, बल्लारपूर सेवा समिती बल्लारपूर) तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. सुधाकर अडबाले (शिक्षक आमदार,विधान परिषद सदस्य, नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघ, सरकार्यवाह, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ), तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा. रेणुका कोकाटे मॅडम (तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी बल्लारपूर) व प्रमुख अतिथी म्हणून मा.डॉ.अल्काताई वाढई (नगराध्यक्षा, नगरपरिषद बल्लारपूर), प्रमुख अतिथी मा. दीपक धोपटे ( जिल्हा कार्यवाहक वि. मा.शी. संघ व गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य), प्रमुख अतिथी मा. डॉ. अनिल वाढई (संचालक सीडीसीसी बँक, चंद्रपूर) मा. सौ. आसमा खान खलीदी मॅडम (प्राचार्य, मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर) म्हणून उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. शाळेचे अध्यक्ष मा. जैनुद्दीन जव्हेरी सर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळेच्या प्राचार्या असमा खान खलीदी मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मा. आमदार सुधाकर अडबाले यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच इतर कौशल्य ही गरजेचे आहे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मा. तहसीलदार,रेणुका कोकाटे मॅडम यांनी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी, त्याचबरोबर आपले ध्येय ठरविणे खूप गरजेचे आहे, तरच विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो असे मार्गदर्शन केले. मा. जैनुद्दीन जव्हेरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळाचे महत्व तसेच शिक्षणाची आजची परिस्थिती याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळेमध्ये वर्षभर विविध स्पर्धेचे तसेच क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून विविध स्पर्धेचे मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये गणित संबोध परीक्षा, भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा, एकलव्य सामान्य ज्ञान परीक्षा,त्याचबरोबर शाळामध्ये झालेल्या बॅडमिंटन सॅक रेस, डॉजबॉल, स्किपिंग, बटाटा रेस, धान्याची रांगोळी स्पर्धा यासारख्या विविध क्रीडा स्पर्धेचे त्याचबरोबर जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता कांबळे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन शैलजा मॅडम यांनी केले. बक्षीस वितरण सोहळा या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.