मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय, बल्लारपूर ची एसएससी बोर्ड परीक्षेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.
ज्योत्स्ना वानखेडे:
बल्लारपूर शहरातील मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालयाचा दहावीचा निकाल 70% लागला आहे.
ज्यामध्ये स्वरुप कु.निधी गणेश ठाकूर याने 81.60% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला, कु. जान्हवी अजय गेडेकर हिने 78.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला कु. ईश्वरी लुकेश्वर बल्की हिने 77.40% गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला.
मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालयातील एकूण 70 विद्यार्थ्यांनी 10 वी ची परीक्षा दिली. यामध्ये प्राविण्य श्रेणीत 4 विद्यार्थी तसेच प्रथम श्रेणीत 09 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे बल्लारपूर सेवा समितीचे अध्यक्ष माननीय जैनुद्दीन जव्हेरी साहेब , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. असमा खान खालीदि मॅडम , पर्यवेक्षिका सौ.सुनीता कांबळे मॅडम, वर्ग 10 वी च्या वर्गशिक्षिका सौ. मीना शेन्डे मॅडम , तसेच सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांना दिले.